Maharaja T20 Trophy 2024 : आयपीएलची स्पर्धा अधिक रंगत होत, असल्याने आता देशांतर्गत क्रिकेटचं महत्तव अधिक प्रमाणात वाढलं आहे. अनेक स्टार खेळाडूंना देखील बीसीसीआयच्या धाकामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागत आहे. अशातच आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विश्रांतीचा सिझन सुरू असतानाच कर्नाटकमध्ये महाराजा टी-20 ट्रॉफी स्पर्धा चर्चेत आली आहे. त्याला कारण बंगळुरु ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात रंगलेला तीन सुपर ओव्हरचा थरारक सामना..


सामन्यात नेमकं काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू ब्लास्टर्सचा कॅप्टन मयंक अग्रवाल याने संघाला हाताशी धरून मजबूत झुंज दिली. पण मनीष पांडेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हुबळी टायगर्सने अखेर बाजी मारली. बंगळुरु ब्लास्टर्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वबाद 164 धावा केल्या आणि बंगळुरु ब्लास्टर्सला 165 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, बंगळुरु ब्लास्टर्सला 20 ओव्हरमध्ये केवळ 164 धावाच करता आल्या अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. इथं खरी लढाई सुरू झाली अन् थ्रिलर सामन्याची सुरूवात...


पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बंगळुरु ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 10 धावा केल्या आणि विजयासाठी 11 धावा दिल्या. बंगळुरूने एक विकेट गमावत 10 धावा कोरल्या होत्या. हुबळीसाठी आव्हान सोपं होतं, पण हुबळीला देखील 10 धावाच करता आल्या. सहाव्या चेंडूवर 2 धावा हवी असताना एकच धाव निघाली अन् सुपर ओव्हर बरोबरीत निघाली. 


आता दुसरी सुपर ओव्हर खेळवण्याची वेळ आली. हुबळी टायगर्सला प्रथम फलंदाजी करायची होती. मनिष पांडे मैदानात असताना देखील हुबळीला 6 बॉलमध्ये केवळ 8 धावा करता आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना बंगळुरूला देखील 8 धावाच करता आल्या. अखेरच्या बॉलवर 2 धावांची गरज होती. त्यावेळी फलंदाजांनी धाव पूर्ण न केल्याने दुसरी सुपर ओव्हर देखील बरोबरीत सोडवावी लागली. आता सामना तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला होता.


पाहा Video



बंगळुरु ब्लास्टर्सला प्रथम फलंदाजी करायची होती. त्यावेळी बंगळुरु ब्लास्टर्सने 6 बॉलमध्ये 12 धावा केल्या अन् हुबळीला 13 धावांचं आव्हान दिलं. हुबळीने आता जिंकूनच येयचं असा निश्चयच केला होता. पहिल्या बॉलपासून हाणामारी सुरू केली अन् सामना 1 बॉल 4 धावांवर येऊन ठेपला. बॉल बॉन्ड्री पार किंवा सामना गमवा अशी परिस्थिती होती. त्यावेळी सहाव्या चेंडूवर चौकार बसला अन् हुबळीने रंगतदार सामना खिशात घातला.