मेलबर्न : क्रिकेटमध्ये स्लोजिंग आणि ऑस्ट्रेलिया टीम म्हणजे आतापर्यंत समीकरणच होते. जगभरात स्लोजिंग करणारी टीम म्हणून ऑस्ट्रेलियाचे नाव घेतले जाते. मात्र आता ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार टीम पेन नवी परंपरा सुरु करतोय. बॉल टेम्परिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आलीये. संपूर्ण क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या घटनेमुळे शरमेने मान खाली घालावी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता ऑस्ट्रेलियाचा नवा कसोटी कर्णधार टीम पेन स्लोजिंगपासून संघाला दूर ठेवणार आहे. ३३ वर्षीय पेनला स्टीव्ह स्मिथच्या जागी कर्णधार बनवण्यात आले. स्मिथवर बॉल टेम्परिंगप्रकरणी एका वर्षाची बंदी घातलीये. 


बीबीसीने पेनच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मला वाटते काय आणि कसे बोलायचे या गोष्टी येणाऱा काळच ठरवेल. त्याच्या नेतृत्वााली खूप काही बोलण्याची संस्कृती सुरु झाली होती. दरम्यान संघात बदल आणण्यासोबतच स्मिथसोबत कायम संपर्कात राहणार असल्याचेही पेनने सांगितले.


ऑस्ट्रेलिया मर्यादित षटकांच्या सीरिजसाठी जूनमध्ये इंग्लंड दौरा करणार आहे. त्यानंतर टीम ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. त्याआधी कोणताही टेस्ट कार्यक्रम नाहीये. कसोटी कर्णधार म्हणाला, मला पुन्हा लोकांचा विश्वास जिंकायचा आहे. आमचे चाहते आणि ऑस्ट्रेलियाच्या लोकांचा सन्मान पुन्हा मिळवायचा आहे.