Tokyo Olympics 2020 | टोकिया ऑलिम्पिकमधून भारतासाठी बॅड न्यूज, P V Sindhu पराभूत
टोकिया ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics 2020) भारतासाठी वाईट बातमी आली आहे.
टोकियो : टोकिया ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics 2020) भारतासाठी वाईट बातमी आली आहे. सेमी फायनल (Semi Final) सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा (P V Sindhu) पराभव झाला आहे. चीनच्या ताई त्झू यिंगने सिंधूचा पराभव केला आहे. (Tokyo Olympics 2020 Badminton womens Singles Semi Final Tai Tzu Ying beat P V Sindhu)
मिशन ब्राँझ मेडल
ताई त्झू यिंगने सिंधूचा पहिल्या सेटमध्ये 21-18 ने पराभव केला. त्यानंतर सिंधूने दुसरा सेट 21-12 च्या फरकाने गमावला. सिंधू भारताला सुवर्णपदक मिळवून देईल, अशी आशा भारतीयांना होती. पण आता सिंधूच्या पराभवामुळे भारताचं स्वप्न तुटलं. दरम्यान आता या पराभवानंतरही सिंधूला ब्राँझ मेडलची संधी आहे. सिंधूला ब्राँझसाठी चीनच्या बिंग जिआओसोबत दोन हात करावे लागणार आहे. दरम्यान सिंधूनने ब्राँझ मेडल जिंकून शेवट गोड करावा, अशीच इच्छा भारतीयांची आहे.