टोकिया :  टोकिया ऑल्मिपिकमधून (tokyo olympics) भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. टीम इंडियाची प्रसिद्घ बॅडमिंटनपटूने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. पी व्ही सिंधूने (PV Sindhu) क्वार्टरफायनलमध्ये जपानच्या आकणे यामागुचा (Akane Yamaguchi) पराभव केला आहे. सिंधूच्या विजयामुळे भारताच्या आणखी एका मेडलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Tokyo Olympics Badminton  Womens Singles  Quarterfinal  PV Sindhu beats Japan s Akane Yamaguchi  move into semi final) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधूने दूसऱ्या ऑल्मिपिकमध्ये अंतिम 4 मध्ये स्थान मिळवलंय. सिंधुने यामागुचीचा 21-13, 22-20 ने पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. पीव्हीने 2016 च्या रियो ऑल्मिपिकमध्ये सिल्वर मेडल मिळवलं होतं. दरम्यान पीव्ही आता मेडलपासून फक्त एक पाऊल दूर आहे. पीव्हीने हा सामना जिंकला तर तिला मेडल मिळेल. असं झाल्यास सिंधू बॅडमिंटनमध्ये 2 मेडल जिंकणारी पहिलीच भारतीय ठरेल.  


सेमी फायनल मॅच केव्हा? 


पीव्ही सिंधूचा सेमी फायनलचा सामना उद्या म्हणजेच शनिवारी (31 जुलै) होणार आहे. ताइवानची ताई त्सू आणि थायलंडची इंतानोन यांच्यात क्वार्टर फायनलचा चौथा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या खेळाडूसोबत पीव्ही सेमी फायनलमध्ये भिडणार आहे.