Tom Latham : अखेर चाहत्यांना उत्सुकता असलेला दिवस उजाडला. 5 ऑक्टोबर पासून वनडे वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. यावेळी पहिला सामना न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळवला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. यावेळी न्यूझीलंडने 2019 च्या फायनलचा वचपा काढत इंग्लंडचा 9 विकेट्सने दारूण पराभव केला आहे. दरम्यान यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने काही खेळाडूंना विजयाचं श्रेय दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड टीमच्या सर्व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडसारख्या बलाढय़ टीमला 282 रन्समध्ये रोखलं. यावेळी 283 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड टीमने या वर्ल्डतपमध्ये 9 विकेट्स राखून सहज विजय मिळवलाय. यावेळी, पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये, टॉम लॅथम त्याच्या बॉलिंग लाइनअपचं कौतुक केलं आहे. 


काय म्हणाला टॉम लॅथम?


इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर आता न्यूझीलंड टीमला या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथमने किवी टीमचं नेतृत्व केलं. यावेळी टॉमच्या नेतृत्वाखाली टीमनेने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. यावेळी सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये टॉम लॅथम म्हणाला की, “इंग्लंडला डावाच्या 30 ओव्हर्सनंतर 282 रन्सवर रोखणं खूप चांगलं होतं. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी उत्तम गोलंदाजी केली. डेव्हन आणि रचिन यांनी साहजिकच चांगली भागीदारी केली. आम्हाला ही कामगिरी अशीच सुरु ठेवायची आहे. 


टॉम पुढे म्हणाला की, “आम्हाला कल्पना होती की, इंग्लंडचे ओपनर्स पहिल्या ओव्हरपासून आमच्यावर अटॅक करतील. मात्र आम्हाला महत्त्वाच्या वेळी विकेट्स मिळाल्या. गोलंदाजांनी काही महत्त्वाच्या ओव्हर्सने योगदान दिलं आणि ते ज्या परिस्थितीत होते त्या परिस्थितीत त्यांना 280 पर्यंत रोखण्यात चांगलं काम केलं. 


“आमचे फलंदाज खेळले, त्यांनी काही उत्कृष्ट शॉट्स खेळले. ज्यावेळी फलंदाज खेळायला उतरले तेव्हा नक्कीच अशी योजना नव्हती. दोघांनीही शॉट्स खेळले तेव्हा छान वाटलं. रवींद्रने उत्तम खेळी खेळली आणि तो ज्या प्रकारे आला आणि त्या पोझिशनवर फलंदाजी केली ती सर्वोत्तम खेळी होती. याचा त्याला अभिमान आहे, असंही टॉम म्हणाला.