List Of Richest Cricketers In India: भारतात क्रिकेटप्रेमींची संख्या खूप जास्त आहे. भारतात सध्या वर्ल्ड कपचा थरार रंगला आहे. आत्तापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत भारत 8 सामने खेळला असून 8ही सामन्यात भारताने विजय खेचून आणला आहे. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा डंका वाजत आहे. अशातच ट्विटवर (X) एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी व्हायरल होत आहे. या यादीत विराट कोहलीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात क्रिकेट आणि क्रिकेटर्स याचे सामान्य नागरिकांना आकर्षण असतं. भारतातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्याव्यतिरिक्त आयपीएलमध्येही खेळतात. त्याचबरोबर खेळाडूंच्या लोकप्रियतेमुळं त्यांना अनेक जाहिरातीत कामदेखील मिळते. त्यामुळं त्यांची गणना जगभरातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये होते. अलीकडेच भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लिस्टमध्ये सर्वात पहिले असलेले नाव पाहून अनेक जण भलतेच खुश झाले आहेत. 


टॉप 10 इंडियन क्रिकेटर्सच्या यादीत सगळ्यात पहिले नाव हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे आहे. या यादीच्यामते, सचिनचे नेटवर्थ 150 मिलियनहून अधिक आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी असून त्याची संपत्ती 115 मिलियन इतकी आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर असतात विराट कोहली असून त्याची नेटवर्थ 112 मिलियन इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. 


चौथ्या क्रमांकावर सौरभ गांगुली असून त्याची नेटवर्थ 60 मिलियन इतकी आहे. त्यातबरोबर सेहवाग आंतरराष्ट्रीय स्कूल आणि स्पोर्ट्स अॅकेडमी आणि कमेंट्री बॉक्समध्ये आपल्या कॉमेंट्रीमुळं वीरेंद्र सेहवाग या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर युवराज सिंग असून त्याची एकूण संपत्ती ४० दशलक्ष रुपये आहे. रोहित शर्मा सातव्या, सुरेश रैना आठव्या, भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड नवव्या स्थानावर आहे. या यादीत गौतम गंभीर 25 दशलक्ष रुपयांच्या संपत्तीसह दहाव्या स्थानावर आहे.


दरम्यान, सोशल मीडियावर ही लिस्ट शेअर करण्यात आल्यानंतर लोकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. या पोस्टवर एक लाखाहून अधिक जणांनी पाहिलं आहे आणि कमेंटही करत आहेत. एका युजरने मजेशीर रिप्लाय करत लिहलं आहे की, यामुळंच गौतम नेहमीच गंभीर असतो. ईमानदारीत गंभीर नेहमीच पहिल्या क्रमाकांवर तर, तिसऱ्या एका युझरने म्हटलं आहे की, प्रत्येक ठिकाणी सचिनच नंबर एक आहे. 



लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर शंका व्यक्त केल्या आहेत. काहींनी विराटच पहिल्या क्रमांकावर असल्याचे म्हटलं आहे. कारण विराटकडे शाहरुखइतक्याच जाहिराती आहेत त्यामुळं त्याला सचिन आणि इतर बॉलिवूड कलाकारांपेक्षा वर असायला हवे, असं एकाने म्हटलं आहे. दरम्यान, ही लिस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली असून ही आकडेवारी खरी आहे का याबाबत अद्याप दुजोरा देण्यात आला नाहीये.