नवी दिल्ली :  रवि शास्त्री यांनी टीम इंडियाच्या मुख्य कोच पदासाठी दावेदारीची घोषणा केली आहे. या पदासाठी इतर नावांच्या तुलनेत रवि शास्त्री याचे नाव सर्वात पुढे आहे. गेल्यावेळी शास्त्री या शर्यतीत कुंबळेच्या मागे राहिले होते. रवि शास्त्रींना या शर्यतीत वीरेंद्र सेहवाग आणि टॉम मुडीयांची टक्कर असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टसनुसार सीएसी मेंबर सौरव गांगुली आणि शास्त्री यांच्या संबंध सामान्य नाही. असे असले तरी शास्त्री यांची दावेदारी मजबूत असण्याचे पाच कारण आहेत... 


कोहलीची पसंती... 


मीडिया रिपोर्ट्स नुसार शास्त्रीच्या कोचपदासाठी विराट कोहलीची पसंती आहे. विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रवि शास्त्री यांना कोच बनविण्याची शिफारस केली होती. विराट आणि रवि शास्त्री यांचे नाते चांगले आहेत. 


टीमच्या कार्यप्रणालीशी परिचित


जाणकारांनुसार बीसीसीआयने रवि शास्त्री यांची निवड कोच म्हणून केली तर या सर्वात सकारात्मक पक्ष आहे की त्यांना टीम इंडियाचा सेटअप माहिती आहे. टीममध्ये समन्वय बसविण्यात त्यांना जास्त वेळ लागणार नाही. आता वर्ल्ड कपसाठी २ वर्षांपेक्षा कमी कालावधी आहे. दोन वर्षाच्या कार्यकाळासाठी नव्या कोचची नियुक्ती होणार आहे. वर्ल्ड कपनंतर कार्यकाळ संपणार आहे. 


कमतरता आणि बलस्थानं माहिती... 


रवि शास्त्री टीम इंडियाचे डायरेक्टर  होण्यापूर्वी कमेंटेटर म्हणून टीम सोबत अनेक दौऱ्यात प्रवास करीत होते. त्याचे खेळाडूंवर बारीक लक्ष असते त्यामुळे त्यांच्या कमतरता आणि बलस्थान माहिती आहे. खेळाडूंसोबत काम करणे सोपे जाणार आहे. 


यशस्वी अनुभव 


शास्त्री ऑगस्ट २०१४ ते जून २०१६ दरम्यान टीमचे डायरेक्टर होते. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ २०१५ आणि २०१६ च्या अनुक्रमे वन डे आणि टी २० वर्ल्ड कप सेमी फायनलपर्यंत पोहचला होता. 


भारताने शास्त्री यांच्या देखरेखीखाली इंग्लडमध्ये २०१४ मध्ये मर्यादीत षटकांची सिरीज आपल्या नावावर केली होती. श्रीलंकेला त्यांच्या घरी जाऊन पराभूत करून टेस्ट सिरीज नावावर केली होती. तसेच देशात दक्षिण आफ्रिका सिरीज जिंकली होती. ऑस्ट्रेलियात भारत टी२० सिरीज जिंकली होती. 


कोच पदासाठी इच्छूक 


रवि शास्त्री स्वतः कोच पदासाठी इच्छूक आहेत. नव्या कोचची निवड दोन वर्षांसाठी होणार आहे. त्यामुळे २०१९ च्या वर्ल्ड कपसाठी तयारी करण्यात येणार आहे. त्यामुळे रवि शास्त्री यांच्या मार्गदर्शनात वर्ल्ड कपची तयारी करण्याची संधी आहे.