Mohammed Nami resigns as captain : टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप 1 मधील ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमधील सामन्यामध्ये यजमानांनी निसटता विजय मिळवला आहे. मात्र पराभवामुळे आता अफगाणिस्तानचा संघ टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सामना झाल्यानंतर संघाचा कर्णधार मोहम्मद नबीने गंभीर आरोप करत कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. (T-20 World Cup Mohammed Nami resigns as captain Afghanistan team)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमचा टी-20 वर्ल्ड कपमधील प्रवास संपला आहे. आम्हाला अपयशी होऊ अशी अपेक्षाही समर्थकांनी केली नव्हती. सामने गमावल्याने जितके तुम्ही दु: खी झाले आहात तितकेच आम्हीसुद्धा झालो आहोत. वर्ल्ड कपआधी एक वर्षे ज्या पद्धतीने आमची तयारी चालू होती ती एका मोठ्या स्पर्धेसाठी कर्णधाराला हवी तशी होत नसल्याचं मोहम्मद नबीने म्हटलं आहे. 


गेल्या एक वर्षापासून आमच्या संघाची तयारी कर्णधाराला हवी तशी नव्हती किंवा मोठ्या स्पर्धेसाठी ती पुरेशी आहे. तसेच, गेल्या काही दौऱ्यांमध्ये संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि माझ्यात संघाचा समतोल साधला जात नव्हता त्यामुळे मी कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. जोपर्यंत व्यवस्थापन आणि संघाला माझी गरज आहे तोपर्यंत मी माझ्या देशासाठी खेळत राहील, असंही मोहम्मद नबीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. 


 



दरम्यान, टी-20 विश्वचषक अफगाणिस्तानसाठी खूपच निराशाजनक होता. सुपर-12 मध्ये थेट पात्र ठरलेल्या या संघाचे दोन सामने पावसामुळे गेले, तर 3 सामन्यात या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या विश्वचषकात अफगाणिस्तान हा एकमेव संघ आहे जो एकही सामना जिंकू शकला नाही.