Sport News :  पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. याआधीही आफ्रिदीने निवृत्ती जाहीर करूनहा आपलं खेळणं चालू ठेवलं होतं. आता आफ्रिदी परत एकदा क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आफ्रिदीने 2023 साली होणाऱ्या PSL मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Shahid Afridi is coming back to the field latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी कुठे जाईल हे मला माहित नाही. मात्र कोणत्याही फ्रँचायझीने मला ऑफर दिल्यास मी नक्की जाईल. कारण हे पाकिस्तानच्या संबंधित आहे, असं शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे. आफ्रिदीचं आता वय 45 वर्षे आहे. या वयातही त्याने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


जेव्हा आफ्रिदीला विचारण्यात आलं की PSLमध्ये कोणत्या संघासोबत खेळताना जास्ता मजा आली. यावर बोलताना, पेशावरी जाल्मीसंघासोबत सर्वात जास्त चांगला वेळ गेला. नवीन तरूणांना अधिकाधिक संधी द्यायचा आमचा प्लान होता. यासोबतच मुलतान सुलतान संघासोबतही मजा केली. हा एका चांगल्या मालकांसह प्रोफेशनल संघ असल्याचं आफ्रिदी म्हणाला. 


दरम्यान, यंदाची PSL 9 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 19 मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. आफ्रिदी PSLमध्ये आतापर्यंत एकूण 6 फ्रँचायझींसाठी खेळला आहे. याशिवाय त्याने पाकिस्तान ज्युनियर लीगमध्ये मर्दान वॉरियर्ससाठी मेंटॉरची भूमिकाही बजावली आहे.