मेलबर्न : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करत टीमने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली विजयचा खरा शिल्पकार ठरलाय. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने गेल्यावर्षीच्या वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा काढलाय.


टीम इंडियाला पाकिस्तानकडून 160 रन्सचं आव्हान मिळालं होतं. पाकिस्तानचीही फलंदाजी करताना फारशी चांगली सुरुवात झाली नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पहिल्याच चेंडूवर शून्यावर  पायचीत अर्शदीपने तंबूचा मार्ग दाखवला. सलामीवीर मोहम्मद रिझवानही जास्त वेळ टिकला नाही. 4 धावांवर असताना अर्शदीपने सेट अप लावत आपल्या जाळ्यात अडकवलं. 15 धावांवर पाकिस्तानचे दोन गडी बाद झाले होते. 


शमीनंतर हार्दिकने शादाब 5, हैदर अली 2, मोहम्मद नवाझ 9 यांना माघारी पाठवलं. दुसरीकडे शान मसूदने शेवटपर्यंत नाबाद राहत एक बाजू लावून धरली होती, त्याने 52 धावा केल्या. शेवटला शाहिन आफ्रिदीने एक चौकार आणि 1 षटकार मारत 16 धावा केल्या. भारताच्या फलंदाजीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.


टीम इंडियाची खराब सुरुवात


टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब सुरुवात झाली. ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल अवघ्या 4 रन्सवर करुन बाद झाले आहेत. त्यानंतर सूर्यकुमारने काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र त्यालाही यामध्ये यश मिळालं नाही. तो 15 रन्स करुन आऊट झाला.