`ओल्ड डॉग` म्हणणाऱ्याची भज्जीने घेतली `शाळा`
टीम इंडियाचा गोलंदाज हरभजन सिंग सोशल मीडियावर अॅक्टिव असणाऱ्या क्रिकेटर्सपैकी एक आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा गोलंदाज हरभजन सिंग सोशल मीडियावर अॅक्टिव असणाऱ्या क्रिकेटर्सपैकी एक आहे.
पण यामूळे अनेकदा त्यांना चाहत्यांच्या उद्धटगीरीचा सामनाही करावा लागतो. असच काहीस 'भज्जी' सोबत झालं आहे.
फोटो ट्विट
नुकताच भज्जीने स्वत: चा एक फोटो ट्विट केला. यानंतर त्या फोटोखाली अनेक कमेंट्स आल्या. पण त्यातील एका महाभागाने असा एक मेसेज केला ज्यामूळे भज्जीचा राग अनावर झाला.
'बॅक टू बेसिक्स'
भज्जीने आपला एक फोटो अपलोड केला त्यावर 'बॅक टू बेसिक्स' असे लिहिले. या फोटोत भज्जी ग्राऊंडवर प्रॅक्टीस करताना दिसत आहे. मैदानावर भज्जीला मेहनत घेताना पाहून अनेकांनी त्याची प्रशंसा केली.
'ओल्ड डॉग'
पण एका महाभागाने 'ओल्ड डॉग' अशी कमेंट त्या फोटोखाली केली. त्यानंतर भज्जी असा काही रिप्लाय केला की कमेंट करणाऱ्याची बोलतीच बंद झाली.
भज्जी ने त्या युजर 'शाळा' घेत आपल्या भाषेत उत्तर दिले.
शेवटची टेस्ट
भज्जी ऑगस्ट २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटची टेस्ट खेळला आहे.
शेवटची वन डे
ऑक्टोबर २०१५ मध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्ध तो शेवटची वन डे खेळला.
शेवटचा टी २०
तर मार्च २०१६ मध्ये दुबई विरुद्ध शेवटची टी २० खेळला.