VIDEO: `सुपरमॅन` बनत उमेश यादवने मारली उडी आणि अडवला फोर
पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये १७२ रन्सवर ऑल आऊट झालेल्या टीम इंडियाने मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
नवी दिल्ली : पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये १७२ रन्सवर ऑल आऊट झालेल्या टीम इंडियाने मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर पहिल्या दोन दिवसांमध्ये खूपच कमी खेळ झाला. टीम इंडियाच्या बॅट्समनला चांगला खेळ करता आला नाही. टीम इंडियाकडून केवळ चेतेश्वर पुजाराला हाफ सेंच्युरी करता आली.
केवळ बॅटिंग आणि बॉलिंगच नाही तर क्रिकेटमध्ये फिल्डिंगही महत्वाची असते. "कॅच पकडा आणि मॅच जिंका" असं म्हटलं जातं.
चांगली बॅटिंग करण्यात अपयश आलेल्या टीम इंडियाला बॉलिंग आणि फिल्डिंग चांगली करुन मॅचवर कब्जा करायचा होता. टीम इंडियाकडून उमेश यादव यानेही वेळेवर जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवत फोर अडवला.
श्रीलंकेचा ओपनर सदीरा समरविक्रमा याने बॅटींगची सुरुवात आक्रमकरित्या केली. त्याने भुवनेश्वरच्या बॉलिंगवर जबरदस्त शॉट खेळला. मग, भुवनेश्वरने आऊट स्विंग टाकला. हा बॉल समरविक्रमाने कव्हर ड्राइव्ह खेळला.
त्यावेळी एक्स्ट्रा कव्हरवर उभ्या असलेल्या उमेश यादवने बॉलचा पाठलाग केला आणि आपल्या शानदार फिल्डिंगचं प्रदर्शन दाखवलं.
दरम्यान, कोलकातामध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताच्या फिल्डिंगमध्ये अनेक कमतरता दिसून आल्या.