नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवने ४ गडी बाद केले. तरीही क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली. ऑस्ट्रेलियाने एकूण ५ विकेट गमावल्या, त्यातील चार उमेश यादव याने घेतल्या. परंतु त्यांचे चाहते त्याबाबत नाराज होते. 


चौथ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने तीन बदल केले. त्यामध्ये भुवनेश्वरऐवजी उमेश यादवची निवड करण्यात आली.ऑस्ट्रेलियन फलंदाजी ढेपाळेल असा कोहलीला विश्वास होता पण तसे झाले नाही.उमेश यादवने ४ बळी घेतले आहेत, पण त्यासाठी त्याने भरपूर धावा दिल्या. पहिल्या पाच षटकात त्याला ३७ धावा दिल्या. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला टार्गेटच केले.