सेहवागचा पुन्हा `ट्विटर` शॉट, बॅंक कर्मचारी दुखावले
भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेद्र सेहवाग निवृत्तीनंतरही कायम चर्चेत असतो. वेगवेगळ्या प्रसंगांवर मिश्किल ट्विट करणं सेहवागला आवडत.
नवी दिल्ली : भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेद्र सेहवाग निवृत्तीनंतरही कायम चर्चेत असतो. वेगवेगळ्या प्रसंगांवर मिश्किल ट्विट करणं सेहवागला आवडत.
त्यामूळे अनेकदा वादही ओढवतात किंवा चाहते 'वाह वा' ही करतात. यावेळच्या त्याच्या ट्विटमूळे बॅंक कर्मचारी दुखावले आहेत.
अम्पायर्सने केली लंचची घोषणा
दुसऱ्या वनडेतही भारताने साऊथ आफ्रिकेविरुद्ध सहज विजय मिळविला. भारताला केवळ २ रन्स हवे होते. त्यावेळीच अम्पायर्सने लंचची घोषणा केली.
भारत विजयापासून केवळ २ रन्स दूर असताना ४० मिनिटांच्या ब्रेकचा अर्थ काय ? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला.
अम्पायर्सच्या या निर्णयामूळे सर्वजण अचंबित झाले. या प्रसंगावर सेहवागने ट्विट केले. अम्पायर्स भारतीय बॅट्समन्ससोबत बॅंकवाल्यांप्रमाणे वागत होते. लंच नंतर या.
व्टिटवर आक्षेप
एक महिलेने या व्टिटवर आक्षेप वर्तविला. मी तिथे काम करते आणि मी ग्राहकांना कधी लंच नंतर या अस सांगितलं नाही.
दोन कर्मचाऱ्यांनीही असाच आक्षेप नोंदवला. मी तुमचा मोठा चाहता आहे. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांशीही चांगले वर्तन करतो. असे त्यांनी म्हटले.
सेहवागचे तात्काळ उत्तर
यावर सेहवागने तात्काळ उत्तर दिले. वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही याला अपवाद आहात. लंच व्यतिरिक्त असे अनेक बहाणे असतात.
सर्व्हर खराब, प्रिंटर चालत नाही, स्टाफ कमी अशी अनेक कारण ऐकायला मिळतात. पण दुर्देवाने सरकारी ऑफिसेसची स्थिती बदलत नाही.