मुंबई : आयपीएलमध्ये 21 वा सामना गुजरात विरुद्ध हैदराबाद झाला. गुजरात टीमला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात एक काळजाचा ठोका चुकवणारी गोष्ट घडली. हैदराबादचा वेगवान बॉलर उमरान मलिक पुन्हा आपल्या घातक बॉलिंगमुळे चर्चेत आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमरान मलिकचा वेग आणि घातक बॉलिंगमुळे तो पुन्हा चर्चेत आला. हार्दिक पांड्या क्रिझवर बॅटिंगसाठी आल्यावर उमरान बॉलिंग करत होता. उमरानने टाकलेला बॉल घातक बाऊन्सर ठरला आणि तो थेट हार्दिक पांड्याच्या हेल्मेटवर बसला. 


हा बॉल हेल्मेटवर एवढ्या जोरात बसला की काही सेकंद मैदानात तणावाचं वातावरण होतं. तातडीनं मैदानात डॉक्टर आले. त्यांनी हार्दिक पांड्याची चौकशी केली.


नियमानुसार बॅट्समनच्या हेल्मेटला बॉल लागल्यानंतर त्याची एक छोटीशी टेस्ट होते. जर बॅट्समनला काही त्रास वाटत असेल तर त्याला मैदानाबाहेर घेऊन जातात. 


हार्दिक पांड्याला बॉल लागला तेव्हा नताशा स्टेडियममध्ये होती. नताशाचा चेहरा उतरला होता. ती ग्राऊंडकडे पाहात राहिली. हार्दिकने पुढच्या काही मिनिटांत पुन्हा बॅटिंग सुरू केली तेव्हा तिच्या जीवात जीव आला. 



गुजरात विरुद्धच्या सामन्यात उमरान मलिकने 145 KMPH हून अधिक वेगानं बॉल टाकला. त्याने सर्वात घातक बॉलिंग 151 च्या स्पीडने केली होती.