मुंबई : टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने इतिहास रचला आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेलेला अंडर-19 वर्ल्डकप टीम इंडियाने जिंकला आणि पाचव्यांदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. शनिवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने सहज विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 189 रन्स केले होते. यानंतर भारताला 190 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने 47.4 ओव्हरने 6 विकेट्स गमावून 195 रन्स करत वर्ल्डकप भारताच्या नावे केला.


भारताला विजयासाठी 190 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं. यावेळी टीम इंडियाने अत्यंत सावधपणे सुरुवात केली. टीम इंडियाची पहिली विकेट दुसऱ्या चेंडूवरच पडल्याने चाहते काहीसे चिंतेत होते. मात्र त्यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीद यांनी उत्तम पार्टनरशीप केली. यानंतर टीम इंडियाला 95, 97 च्या स्कोअरवर सलग दोन धक्के बसले.


शेवटी निशांत सिद्धू, राज बावा आणि नंतर दिनेश बाना यांच्या जोरावर टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली. दिनेश बानाने सिक्स ठोकून भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिलं.


इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय योग्य ठरला नाही. टीम इंडियाने सुरुवातीपासूनच इंग्लंडवर दबाव कायम ठेवला. राज बावा आणि रवी कुमार यांच्या उत्तम गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला 189 रन्समध्ये रोखलं.


इंग्लंडकडून फक्त जेम्स रीयूला एक बाजू सांभाळत 95 रन्सची उत्तम खेळी केली. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने मोठी धावसंख्या केली नाही.