IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या रजत पाटीदारने अप्रतिम खेळी खेळली. रजत पाटीदार महत्त्वाच्या क्षणी संघाच्या कामी आला. त्याने केवळ 54 चेंडूत 112 धावा ठोकल्या. आरसीबी अडचणीत असताना त्याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजत पाटीदारने आपल्या डावात एकूण 54 चेंडू खेळले, ज्यात त्याने 112 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 7 षटकार ठोकले. रजत पाटीदारचा स्ट्राईक रेट 200 पेक्षा जास्त होता. रजतचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक होते.


रजत पाटीदारनेही आपल्या खेळीत अनेक विक्रम केले. या हंगामात झळकावलेल्या सर्व शतकांपैकी रजत पाटीदारने सर्वात जलद धावा केल्या. रजतने 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, त्याने 49व्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला.


यासोबतच तो आयपीएलच्या प्लेऑफमध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही सामील झाला. या यादीत वीरेंद्र सेहवाग, शेन वॉटसन, वृद्धिमान साहा, मुरली विजय यांच्या नावांचा समावेश आहे.


अनकॅप्ड खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर रजत पाटीदार देखील या यादीत येतो. आयपीएलमध्ये शतक करणारा तो चौथा अनकॅप्ड खेळाडू आहे. त्याच्या आधी पॉल वल्थाटी, मनीष पांडे, देवदत्त पडिक्कल यांनी अशी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.


रजत पाटीदार मध्य प्रदेशातून आला होता, तो या वर्षीच्या मेगा लिलावात विकला गेला नाही आणि त्याला कोणीही विकत घेतले नाही. नंतर आरसीबीने 20 लाखात त्याला एका जखमी खेळाडूच्या जागी रिप्लेस केले.


रजत पाटीदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, त्यानंतरही तो मेगा लिलावात अनसोल्ड राहिला. पण संधी मिळताच त्याने त्याचं सोनं केलं. रजत पाटीदारने या मोसमात आतापर्यंत 275 धावा केल्या आहेत.