Urvashi Rautela-Rishabh Pant: देशात बॉलिवूडप्रमाणे (Bollywood) क्रिकेट (Cricket) देखील तितकेच प्रसिद्ध आहे. या दोन्ही इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटींची नावेही एकमेकांसोबत अनेकवेळा जोडली गेली आहेत आणि जात आहेत. अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी बॉलिवूड अभिनेत्रींशी सातफेरे घेतले आहेत. सध्या अशीच एक जोडी चर्चेत आहे. ती म्हणजे ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela). गेल्या काही काळापासून उर्वशी ही ऋषभ पंतच्या मागे लागल्याचे पाहिले जात आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून ऋषभ पंत याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल झाला होता. आता उर्वशीने शेअर केलेला फोटो व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू ऋषभ पंत याच्या अपघातानंतर (Rishabh Pant Accident) अभिनेत्री उर्वशी रौतेला  (Urvashi Rautela) पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. उर्वशीने (Urvashi Rautela Photo) नुकताच असा फोटो शेअर केला आहे, जो पाहून सोशल मीडियावर अशी अटकळ बांधली जात आहे की, भावूक झालेली उर्वशी ऋषभ पंत (Rishabh Pant Urvashi Rautela Photo) याला भेटायला पोहोचली.


उर्वशीने शेअर केला हॉस्पिटलचा फोटो! 



उर्वशी रौतेला हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलचा फोटो शेअर केला आहे. उर्वशीच्या इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलचा फोटो (Urvashi Rautela New Photo) पाहिल्यानंतर उर्वशी आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) या दोघांच्याही चाहत्यांमध्ये या अभिनेत्रीच्या मनात काय चालले आहे, असा संभ्रम झाला आहे. ती खरोखरच ऋषभ पंतचा अपघात पाहण्यासाठी खचलेल्या मनाने गेली की सोशल मीडियावर लाइमलाइट होण्याचा काही मार्ग आहे. 



उर्वशी हिची ऋषभसाठी प्रार्थना पोस्ट चर्चेत


ऋषभ पंत याच्या अपघातानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेला  (Urvashi Rautela Relationship) हिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. फोटोसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये प्रेइंग असे लिहिले होते, त्यानंतर सोशल मीडियावर लोक तिची स्तुती करत होते की, शेवटी प्रेम असेच असते... अभिनेत्रीच्या पोस्टनंतर तिची आई मीरा रौतेला (Urvashi Rautela Mother) यांनीही एक पोस्ट लिहिली. सोशल मीडिया, ज्यामध्ये ऋषभ याच्या तब्येतीसाठी अनेकांकडून प्रार्थना करण्यात येत आहेत. उर्वशीची आई मीरा रौतेला (Urvashi Rautela Mother Instagram) यांनाही पोस्ट केली. या पोस्टमुळे सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोल करण्यात आले.