धावपटू उसेन बोल्ट फुटबॉलच्या मैदानावर दिसणार
१९ सुवर्ण पदाकांचा बादशहा धावपटू उसेन बोल्ट आता फुटबॉलच्या मैदानावर दिसणार आहे. वेगाचा बादशहा म्हणून त्याला ओळखले जाते. आता तो फुटबॉल खेळणार असल्याने त्याची चपळता मैदानावर पाहायला मिळणार आहे.
लंडन : १९ सुवर्ण पदाकांचा बादशहा धावपटू उसेन बोल्ट आता फुटबॉलच्या मैदानावर दिसणार आहे. वेगाचा बादशहा म्हणून त्याला ओळखले जाते. आता तो फुटबॉल खेळणार असल्याने त्याची चपळता मैदानावर पाहायला मिळणार आहे.
उसेन बोल्ट (३०) दुखापतीतून सावरल्यानंतर फुटबॉल खेळण्यास उत्सुक आहे. अॅथलेटिक्समधील कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात बोल्टला दुखापतींनी हैराण केले. अंतिम सामन्यात तर दुखापतीमुळेच त्याचे सुवर्णपदकाचे स्वप्न अपूर्ण राहिले.
बोल्ट सामाजिक कार्यासाठी २ सप्टेंबर रोजी मँचेस्टर युनायटेडकडून मैदानात उतरेल आणि बार्सिलोना विरुद्ध फुटबॉल खेळेल. बोल्ट मँचेस्टर युनायटेडकडून खेळण्यास उत्सुक आहे. धावपटू होण्याआधी मँचेस्टर युनायटेडकडून खेळावे हेच बोल्टचे स्वप्न