`कलंक लावणारा वॉर्नर हिरो कसला?` म्हणणाऱ्या मिचेल जॉनसनवर उस्मान ख्वाजाची सडकून टीका, म्हणतो...
Usman Khawaja On David Warner Farewell : कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करणाऱ्या फलंदाजाला त्याची फेअरवेल मॅच ठरवण्याची आणि फेअरवेल मालिकेत खेळण्याची संधी का दिली जातीये? असा सवाल जॉन्सनने (Mitchell Johnson) उपस्थित केलाय. त्यावर उस्मान ख्वाजाने वॉर्नरची बाजू सावरलीये.
Usman Khawaja On Mitchell Johnson : ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्यावर (Mitchell Johnson on David Warner) सडकून टीका केली होती. ज्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचं नाव बदनाम केलं होतं, त्याच खेळाडूला आता हिरो म्हणून निरोप का देताय? असा सवाल मिचेल जॉन्सन याने विचारला होता. बॉल टॅम्परिंग प्रकरणावरून जॉन्सनने वॉर्नरवर टीका केली आहे. त्यावरून आता क्रिडाविश्वात जोरदार चर्चा होताना दिसते. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने कडक शब्दात मिशेल जॉन्सनला (Mitchell Johnson) खडे बोल सुनावले आहेत.
काय म्हणाला Usman Khawaja ?
डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ माझ्यासाठी हिरो आहेत. दोघंही जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिले. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळाली. कोणीही परिपूर्ण नसतो, मिशेल जॉन्सन परिपूर्ण नाही. डेव्हिड वॉर्नर परिपूर्ण नाही आणि स्टीव्ह स्मिथ देखील नाही. डेव्हिड वॉर्नरने क्रिकेटसाठी जे योगदान दिलं, त्याकडे सकारात्मक पाहिले पाहिजे, असं स्पष्ट मत उस्मान ख्वाजा याने मांडलं आहे. सँडपेपर स्कँडलमध्ये सामील असलेला कोणीही हिरो ठरत नाही, या वक्तव्यावर उस्मान ख्वाजा याने सहमती दाखवली नाही.
काय म्हणाला होता Mitchell Johnson ?
ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नरच्या फेअरवेल मालिकेची तयारी करत आहोत. पण मला कोणी सांगू शकेल का, आपण असं का करतोय? कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करणाऱ्या फलंदाजाला त्याची फेअरवेल मॅच ठरवण्याची आणि फेअरवेल मालिकेत खेळण्याची संधी का दिली जातीये? असा सवाल जॉन्सनने उपस्थित केलाय. हिरोसारखा निरोप का दिला जात आहे? चीटिंग करणाऱ्या खेळाडूंना असा आदर देणे योग्य आहे का? असा सवाल देखील त्याने विचारला होता.
दरम्यान, 2018 साली झालेल्या ऑस्ट्रेलियन बॉल-टेम्परिंग प्रकरणाला सॅंडपेपरगेट स्कँडल असंही म्हणतात. मार्च 2018 मध्ये, न्यूलँड्स, केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या कसोटीदरम्यान, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट हा चेंडू उड्डाणात स्विंग करण्यासाठी सॅंडपेपरने एका बाजूने खडबडीत करण्याचा प्रयत्न करत असताना टीव्ही कॅमेऱ्यांनी पकडला होता. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर कबूली दिली होती.
पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ (PAK vs AUS)
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, लान्स मॉरिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.