मुंबई : भारताने जम्मू-काश्मीरसाठी असलेला अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानचं पित्त खवळलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जायचा प्रयत्न करत आहेत, पण यामध्ये त्यांना यश येत नाही. याप्रकरणी पाकिस्तानमधले सेलिब्रिटी इम्रान खान यांना पाठिंबा देत आहेत. पाकिस्तानी कलाकार वीणा मलिकनेही इम्रान खान यांना पाठिंबा देताना हरभजन सिंगची पंगा घेतला, पण हरभजनने वीणा मलिकची बोलती बंद केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात केलेल्या भाषणावर टीका करणारं ट्विट हरभजनने केलं होतं. या ट्विटवर वीणा मलिकने निशाणा साधला. तुला इंग्रजी समजत नाही का? असा प्रश्न वीणा मलिकने हरभजनला विचारला. पण हा प्रश्न विचारताना स्वत: वीणा मलिक इंग्रजी स्पेलिंग चुकली.



हरभजन सिंगनेही मग वीणा मलिकला तिच्या चुकलेल्या इंग्रजी स्पेलिंगबद्दल सुनावलं. पुढच्यावेळी कोणताही इंग्रजी शब्द लिहिताना पहिले वाच आणि मग पोस्ट करं, असं हरभजन म्हणाला. यानंतर मात्र वीणा मलिकची बोलतीच बंद झाली.