IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीग या जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या टी 20  लीगसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर दरम्यान ऑक्शन पार पडत आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरु असलेल्या ऑक्शनच्या पहिल्या दिवशी तीन भारतीय खेळाडूंसाठी सर्वाधिक बोली लावण्यात आलेली आहे. सर्वात महागडे खेळाडू म्हणून श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांची नाव चर्चेत होतीच मात्र याशिवाय अधिक चर्चेत नसललेया एका खेळाडूवर देखील संघांनी मोठी बोली लावली. 


व्यंकटेश अय्यरने खाल्ला भाव : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यंकटेश अय्यर याला कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल ऑक्शनपूर्वी रिलीज केले होते. त्यामुळे त्याने 2 कोटींच्या बेस प्राईजवर आपले नाव नोंदवले.  आयपीएल ऑक्शनपूर्वी सर्वाधिक बोली लागणाऱ्या खेळाडूंच्या यादीत व्यंकटेश अय्यरचे नाव कुठेही नव्हते. मात्र जेव्हा अय्यर ऑक्शन टेबलवर आला तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स सहित बहुतेक सर्व संघानी व्यंकटेश अय्यरसाठी बोली लावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये व्यंकटेश अय्यरसाठी मोठी फाईट झाली. त्यामुळे बोली वाढून 20 कोटींच्या पार गेली. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटींची बोली लावून व्यंकटेश अय्यरला आपल्या संघात घेतले. 



IPL मध्ये सर्वात महागडा तिसरा भारतीय खेळाडू : 


आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये सुरुवातीला श्रेयस अय्यरवर पंजाब किंग्सने विक्रम बोली लावून त्याला 26.75 कोटींना विकत घेतलं. त्यानंतर ऋषभ पंत ऑक्शन टेबलवर आला तेव्हा त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडले. पंतला लखनऊ सुपर जाएंट्सने तब्बल 27 कोटींना विकत घेतले. त्यामुळे पंत हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर व्यंकटेश अय्यरला केकेआरने 23.75 कोटींची बोली लावून खरेदी केले. त्यामुळे व्यंकटेश अय्यर हा आयपीएलमधील सर्वात महागडा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.