मुंबई : टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसाद याने शुक्रवारी बीसीसीआयच्या पदावरुन राजीनामा दिला आहे.


वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महिन्याभरातच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यंकटेश प्रसाद याने बीसीसीआयच्या कनिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अंडर-१९ वर्ल्ड कप भारताने जिंकल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच व्यंकटेश प्रसादने राजीनामा दिलाय.


वादामुळे राजीनामा?


व्यंकटेश प्रसाद गेल्या अडीच वर्षांपासून या पदावर कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत प्रसादचा वाद सुरु होता.


अध्यक्षपदावर गेल्या ३० महिन्यांपासून


व्यंकटेश प्रसाद अध्यक्षपदावर गेल्या ३० महिन्यांपासून कार्यरत होता. व्यक्तिगत कारणामुळे व्यंकटेश प्रसादने आपला राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे.


असा अंदाज वर्तवण्यात येतोय


बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "एखादी आयपीएल फ्रँचाइसी घेण्याच्या तयारीत प्रसाद असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच त्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असावा."


बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सीके खन्ना यांनी म्हटलं की, "मी व्यंकटेश प्रसाद याला फार समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता."