`फसवणूक ही फसवणूकच`; या खेळाडूला उपकर्णधार बनवल्याने संतापला दिग्गज
क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुन्हा अशाच एका वादात सापडला आहे.
मुंबई : स्टीव्ह स्मिथला संघाचा उपकर्णधार बनवण्याच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर स्मिथला 3 वर्षांपूर्वी कर्णधारपद गमवावं लागलं होतं. त्याच्यावर 12 महिन्यांची बंदीही घालण्यात आली होती.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुन्हा अशाच एका वादात सापडला आहे. अलीकडेच, टीम पेनने महिला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवल्याबद्दल खेद व्यक्त करत कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्याने वर्षभर क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.
टीम पेनने कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पूर्णपणे नवीन सुरुवात करायला हवी होती, असं चॅपल यांचं म्हणणं आहे. उपकर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथकडे धुरा देऊन त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही.
वॉर्नर आणि स्मिथ यांना वेगळी वागणूक का?
एकाच गुन्ह्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर वेगळे निर्बंध करण्यात काही अर्थ नाही. वॉर्नर, स्मिथवर 12 महिन्यांची, तर कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र या डावखुऱ्या सलामीवीरावरही ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून कायमची बंदी घालण्यात आली. स्मिथच्या बाबतीत असं केलं गेलं नाही. त्याच्यावर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावर केवळ 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
फसवणूक ही फसवणूकच असते
ते पुढे म्हणाले, “फसवणूक मोठी असो वा छोटी, ती फसवणूक असते. माझ्या दृष्टीने ती अजूनही फसवी आहे."