मुंबई : टेलीकॉम ऑपरेटर कंपनी वोडाफोन-आइडिया (Vi) Dream11 IPL 2020 ची को-स्पॉन्सर बनली आहे. IPL 2020 ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून यूएई (UAE)येथे होणार आहे. ही माहिती कंपनीने शनिवारी एका प्रेस रिलीज द्वारे दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोडाफोन आणि आयडिया या कंपनीचा IPL क्रिकेट टूर्नामेंटमध्ये याआधीही काहीना काही सहभाग राहिला आहे. ऑगस्ट 2018 मध्ये पहिल्यांदा वोडाफोन आयडिया कंपनी एकत्र आल्यानंतर स्पॉन्सरशिप डील साईन केली आहे. ही कंपनी आता 'Vi' ब्रांड खाली ऑपरेट होत आहे.


Vi ला T-20 प्रीमियर लीगच्या लाईव्ह ब्रॉडकास्टची को-स्पॉन्सरशिप राइट्स देखील मिळाल्या आहेत.  Dream-11 IPL 2020 चं आयोजन यूएईमध्ये होत असून याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.


Dream11 ने 222 कोटी रुपयांमध्ये IPL 2020 ची स्पॉन्सरशिप मिळवली होती. याआधी भारत आणि चीन यांच्यातील तणावामुळे विवोला स्पॉन्सरशिप देण्यास विरोध होत होता. त्यामुळे बीसीसीआयने यंदा ड्रिम ११ या कंपनीला आयपीएलचं टायटल स्पॉन्सरशिप दिले आहे.


सध्या Vi ने स्टार स्पोर्ट्ससह को-स्पॉन्सर डीलबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मागील आठवड्यात सोमवारी वोडाफोन-आयडियाने भारतात आपली नवी ओळख जाहीर केली होती. Vi कंपनीचे भारतात जवळपास 280 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.