नागपूर : रणजी स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी  करीत विजतेपद पटकवणाऱ्या  विदर्भ क्रिकेट संघाचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या सिव्हिल लाईन मधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन च्या मैदानात हा जाहीर सत्कार कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला विजेत्या रणजी संघासोबत कोच चंद्रकांत पंडीत, विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी व आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर उपस्थित आहेत. रणजी मॅचमध्ये विदर्भाच्या टीमने दिल्लीचा पराभव करत विजय मिळवला आहे. विदर्भाच्या टीमने दिल्लीच्या टीमचा ९ विकेट्स राखून धुव्वा उडवला आहे.


या विजयासोबतच विदर्भाच्या टीमने पहिले रणजी विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. विदर्भाच्या टीमने अष्टपैलु कामगिरी दाखवल्यामुळे हा इतिहास घडला आहे. विदर्भाच्या टीमकडून पहिल्या इनिंगमध्ये अक्षय वाडकरने १३३ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळली. त्यामुळे विदर्भाच्या टीमला मॅचवर आपली मजबूत पकड निर्माण करता आली. विदर्भचा फास्ट बॉलर रजनीश गुरबानी याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट्स घेतले. तर, दुसऱ्या इनिंगमध्ये २ विकेट्स घेतले. अशा प्रकारे रजनीश गुरबानी याने या मॅचमध्ये एकूण आठ विकेट्स घेतले आहेत.