इराणी करंडकासाठी विदर्भाचा संघ सज्ज
रणजी करंडक जिंकल्यामुळे संघाचा विश्वास दुणावला आहे.
नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्राचा पराभव करुन रणजी करंडकावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरले. यानंतर विदर्भाचा संघ इराणी करंडकात विजेतपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी 2018 ला विदर्भ संघाने शेष भारत संघाचा पराभव करत इराणी करंडकावर आपले नाव कोरले होते.
आजपासून 12 फेब्रुवारीपासून विदर्भातील जामठा मैदानावर विदर्भ विरुद्ध शेष भारत संघात सामना होणार आहे. सध्या विदर्भ संघाची जोरदार कामगिरी सुरु आहे. रणजी करंडक जिंकल्यामुळे संघाचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळे विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. यंदाच्या रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात अक्षय कर्णेवार आणि आदित्य सरवटे या जोडीने विदर्भाला विजय मिळवून देण्यासाठी बहुमोल कामगिरी केली होती. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंकडून क्रिकेट प्रेमींकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.
विदर्भ : फैज फजल, (कर्णधार), वसीम जाफर, आर. संजय, गणेश सतीश, अक्षय वाडकर, अथर्व तायडे, मोहित काळे, सिद्धेश वाठ, रजनीश गुरबानी, आदित्य सरवटे, अक्षय कर्णेवार, अक्षय वाखरे, यश ठाकूर, सुनिकेत बिंगेवार, दर्शन नळकांडे.
शेष भारत संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयांक अग्रवाल, अनमोलप्रित सिंग, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, धमेंद्रसिंग जडेजा, राहुल चाहर, अंकित राजपूत, तन्वीर उल हक, रोनित मोरे, संदीप वॉरियर, रिंकू सिंग, स्नेल पटेल.