`आम्ही चुकीचं केलं...`; `त्या` विकेटच्या वादावर कर्णधार Harmanpreet Kaur ने सोडलं मौन
टीम इंडियाच्या महिलांनी इंग्लंडच्या महिलांना चांगलीच धूळ चारली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 3-0 असा सूपडा साफ केला. मात्र, या शेवटच्या सामन्यातील विजयाने वादातही भर पडली.
इंग्लंड : टीम इंडियाच्या महिलांनी इंग्लंडच्या महिलांना चांगलीच धूळ चारली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा 3-0 असा सूपडा साफ केला. मात्र, या शेवटच्या सामन्यातील विजयाने वादातही भर पडली. दीप्ती शर्माने गोलंदाजी करताना चार्ली डीनला नॉन-स्ट्रायकर असताना रनआऊट केलं. दरम्यान या पद्धतीवर बरीच चर्चा झाली. मात्र भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नियमांचा धडा समजावून सांगितल्यानंतर सर्वांची बोलती बंद केली.
चार्ली डीन आणि फ्रेया डेव्हिस यांनी 10व्या विकेटसाठी 35 रन्स जोडून इंग्लंडच्या विजयाच्या आशा उंचावल्या. दीप्तीने मात्र समजूतदारपणा दाखवत चार्ली डीनला गोलंदाजी टाकताना रनआऊट केलं.
सामन्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सुरुवातीला तिने टाळण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा विचारलं असता त्याने इंग्लिश समालोचकाला सडेतोड उत्तर दिलं. हरमनप्रीत म्हणाली, "आम्ही घेतलेल्या उर्वरित 9 विकेट्सबद्दल तुम्ही विचारलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. मुळात यावरून क्रिकेटपटू म्हणून आपण किती सतर्क आहोत, हे दिसून येतं. आम्ही कोणतीही चूक केली नाही."
ती पुढे म्हणाली, "हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही काही नवीन केलंय असं मला वाटत नाही. मी माझ्या खेळाडूला पाठिंबा देईन. तिने नियमाबाहेर काहीही केलेलं नाही. शेवटी विजय हा विजय असतो."
फ्रेया डेव्हिस फलंदाजी करत होती आणि दीप्ती गोलंदाजी करत होती. जेव्हा दीप्ती गोलंदाजी करण्यासाठी पुढे गेली, तेव्हा ती गोलंदाजी करण्याआधीच चार्ली डीन लाईनट्या खूप पुढे गेली आणि दिप्तीने तिला रनआऊट करून टीमला विजय मिळवून दिला.