नवी दिल्ली : वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन क्रिस गेल ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी तो कुठलातरी नवा रेकॉर्ड करतो. आता पुन्हा एकदा क्रिस गेलने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये गेलने नवा रेकॉर्ड केला आहे. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या एविन लुईससोबत इनिंगची सुरुवात करण्यासाठी गेल मैदानात उतरला. यावेळी गेलने २१ बॉल्समध्ये धडाकेबाज बॅटींग करत ४० रन्स केले.


क्रिस गेलने या दरम्यान ३ फोर आणि ४ सिक्सर लगावले. मात्र, पहिला सिक्सर लगावताच गेलने आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.


इंग्लंड विरोधात झालेल्या या मॅचमध्ये पहिला सिक्सर मारताच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये गेलने आपल्या सिक्सरची सेंच्युरी पूर्ण केली. ही मॅच खेळण्यापूर्वी गेलच्या नावावर ९९ सिक्सरची नोंद होती.



टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्याचा रेकॉर्डही गेलच्याच नावावर होता. मात्र, सिक्सरची सेंच्युरी करत आता अनोखा रेकॉर्ड क्रिस गेलने आपल्या नावावर केला आहे.


क्रिस गेलने आतापर्यंत खेळलेल्या ५२ टी-२० मॅचेसमध्ये ४९ इनिंग्स खेळत १५३७ रन्स केले. या दरम्यान गेलने १३४ फोर आणि १०३ सिक्सर लगावले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये गेलचा स्ट्राइक रेट जवळपास १५ आहे.