मुंबई : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या ११व्या पर्वाला सुरूवात होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. येत्या ७ एप्रिलपासून देशभरात आणि जगभरातील क्रिकेट प्रेमींना आयपीएलचा थरार पहायला मिळेल. क्रिकेट हा खेळ दिवसेंदिवस तांत्रिकदृष्ट  अधिक प्रगल्भ होत चालले आहे. मग ते कसोटी क्रिकेट असो, एक दिवसीय असो किंवा आयपीएल असो. त्यामुळे सर्वच प्रकारच्या क्रिकेटला सामोरे जाताना खेळाडू मेहनत घेताना दिसतात. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज दोन वर्षानंतर पुन्हा पुनरागमन करत आहे. या टीमचा कप्तान मेहेंद्र सिंह धोनी सध्या जोरदार मेहनत घेताना दिसत आहे. आयपीएल पर्वाला सामोरे जाण्यासाठी धोनी कसे परिश्रम घेत आहे याबाबतचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.


चेन्नई सुपर किंग्जची धुरा धोनीच्या हातात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये पुनरागमन करणार्या चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीच्या हातात असणार आहेत. २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या आयपपीएलच्या पहिल्या पर्वापासून २०१५ पर्यंत चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद धोनीने सांभाळले आहे.



मन लाऊन धोनीचा सराव


धोनीच्या फलंदाजीची काही विशेष वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यांच्या जोरावर धोनी आपली खेळी मैदानात दाखवत असतो. अनेकदा या खेळीमुळे संघाला विजयही मिळत असतो. पण, त्यामागे धोनीचे कष्टही असतात. या व्हिडिओतही धोनीचे परिश्रम दिसतात. व्हिडिओत धोनी एकूण तीन चोंडू मारताना दिसतो आहे. त्यात पहिले दोन चेंडू त्यांनी अत्यंत अरामात आणि एका हातात बॅट पकडून मारले आहेत. पण, तिसरा चेंडू मात्र धोनीच्या फलंदाजीचे दर्शन घडवताना दिसतो. अखेरचा चेंडू धोनीने एका मजबूत फटक्याच्या रूपात टोलावला आहे. तुम्हीही या व्हिडिओची मजा घेऊ शकता.