दुबई : राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात दिनेश कार्तिक फलंदाजी करताना जरी शून्यावर आऊट झाला असला तरी, पण त्याने विकेटच्या मागे आश्चर्यकारक कामगिरी केली. कार्तिकने विकेटकीपर म्हणून चार कॅच घेतले. पण यात त्याने महत्त्वाची बेन स्टोक्सची विकेट घेतली. बेन स्टोक्सचा जबरदस्त कॅच घेऊन कार्तिकने राजस्थानला मोठा धक्का दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने 11 बॉलमध्ये दोन फोर आणि एका सिक्ससह 18 रन केले होते. स्टीव्ह स्मिथसह तो क्रीजवर होता. कमिन्सच्या बॉलवर शॉट खेळताना कट लागून बॉल मागे गेला. कार्तिकने डाय मारत उत्कृष्ट कॅच घेतला. कार्तिकचा हा कॅच पाहून स्वत: बेन स्टोक्स आश्चर्यचकित झाला.



बेन स्टोक्सची विकेट पडली त्यावेळी राजस्थानच्या संघाने 2 ओव्हरमध्ये 1 विकेट गमवून 27 रन केले होते. त्यानंतर स्टोक्सची विकेट पडल्यानंतर राजस्थानची पडझड सुरु झाली. या महत्त्वपूर्ण सामन्यात राजस्थानचा 60 धावांनी पराभव झाला.