मुंबई : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्होची चर्चा जेवढी क्रिकेटच्या मैदानात असते तेवढीच मैदानाबाहेरही असते. ड्वॅन ब्राव्हो हा त्याच्या गाणी आणि डान्ससाठी प्रसिद्ध आहे. आता ब्राव्हो पुन्हा एकदा नवीन गाणं घेऊन आला आहे. ब्राव्होचं 'बोल देम आऊट' हे गाणं सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. ब्राव्होनं हे गाणं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. ड्वॅन ब्राव्हो सध्या कॅरेबियन प्रिमिअर लीग (सीपीएल)मध्ये खेळत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी ब्राव्होचं चॅम्पियन सॉंगही हिट झालं होतं. आयपीएल २०१८ दरम्यान ब्राव्होनं 'रन द वर्ल्ड' हे गाणं रिलीज केलं होतं. ब्राव्होच्या गाण्यांवर विराट कोहली, लोकेश राहुल आणि हरभजन सिंगही नाचताना दिसले होते. २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कपवेळी ब्राव्होचं चॅम्पियन हे गाणं हिट झालं होतं. आयपीएलमध्ये ब्राव्हो चेन्नईच्या टीमकडून खेळतो.