नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान बॉलर आशिष नेहराने न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीत शेवटचा टी-२० सामना खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवॄत्ती घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात त्याला भलेही विकेट मिळाली नसेल, पण त्याला निरोप ऎतिहासिक देण्यात आला. त्याने सामन्यातील पहिला आणि शेवटचा ओव्हर टाकला. त्याने एकूण ४ ओव्हर्समध्ये २९ रन्स दिले. 


सामन्यानंतर सहकारी खेळाडूंसोबत नेहराने मैदानाला चक्कर मारला. त्यासोबतच विराट कोहली आणि शिखर धवन यांनी त्याला खांद्यावर घेऊन फिरवले. नेहमीप्रमाणे यावेळीही नेहरा लाजत होता. यावेळी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू बिशन सिंह बेदी उपस्थित होते. नेहरासोबतच टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी त्यांच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले. 



त्यानंतर नेहरासोबत खेळाडूंचे फोटोही घेण्यात आला. यावेळी नेहराचं संपूर्ण कुटुंब मैदानात हजर होतं. नेहराची खासियत म्हणजे तो त्याच्या करिअरमधील क्रिकेटच्या तीन फॉर्मेटचे अंतिम सामने वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतॄत्वात खेळला. नेहराने करिअरमध्ये १७ टेस्ट सामने खेळले. यातील शेवटची टेस्ट त्याने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात २००४ मध्ये खेळली.