नवी दिल्ली :  पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान सुपर लीगमध्ये टी २० टुर्नामेंट पेशावर जाल्मीच्या टीमने गुरूवारी एका महत्त्वाच्या सामन्यात कराची किंग्जला ४४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात कराचीचा पराभव झाला पण, शाहिद आफ्रिदी आपल्या जुन्या रंगात पाहायला मिळाला. 


 



शाहिद आफ्रिदीने आक्रमक फलंदाजी करताना चार चेंडूत लगोपाठ चार षटकार लगावले. पीएसएलच्या इतिहास असा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.  ४४ चेंडूत १०९ धावांची गरज  होती. त्याने ८ चेंडूत ४ षटकांच्या मदतीने झटपट २६ धावा केल्या.