नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममधील ग्लेन मॅक्सवेल जितका चांगला बॅट्समन आहे तितकाच चांगला तो फिल्डरही आहे. याचाच प्रत्यय बिग बॅश लीगमध्ये आला.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेल मेलबर्न स्टार्सच्या टीमकडून खेळत आहे. त्याने मेलबर्न रेनेगेड्स विरोधात खेळताना एक जबरदस्त कॅच पकडली. 


मॅक्सवेलने घेतलेली कॅच पाहून जगप्रसिद्ध जॉन्टी रोड्सची आठवण तुम्हाला नक्कीच होईल. मॅक्सवेलने या मॅचमध्ये एकूण चार कॅचेस घेतल्या. मात्र, एक कॅच खूपच जबरदस्त होती.


शुक्रवारी मेलबर्न स्टार्स आणि रेनेगेड्स यांच्यात मॅच खेळण्यात आली. या मॅचमध्ये मेलबर्न स्टार्सने ड्वेन ब्रावो कॅप्टन असलेल्या मेलबर्न रेनेगेड्सच्या टीमचा २३ रन्सने पराभव केला.


पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या मेलबर्न स्टार्सच्या टीमच्या केविन पीटरसनने केलेल्या ७४ रन्सच्या जोरावर ४ विकेट्स गमावत १६७ रन्स केले. 


अशी घेतली जबरदस्त कॅच 


मॅक्सवेलने या मॅचमध्ये चार कॅचेस घेतल्या. मात्र, त्याने ल्यूडमॅनची घेतलेली कॅच पाहून सर्वांनाच जॉन्टी रोड्सची आठवण झाली. मॅक्सवेलने आधी आपल्या हाताने शॉट रोखला आणि त्यानंतर हवेतच मागच्या बाजुला फिरुन कॅच पकडली.



अशीच कॅच जॉन्टी रोड्सने घेतली होती



मॅक्सवेलने जशी कॅत घेतली अगदी तशीच कॅच दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्सने इंग्लंड विरोधात खेळलेल्या मॅचमध्ये घेतली होती.