Gautam Gambhir Viral Video: सोमवारी आयपीएल 2023 चा 15 वा सामन्याने सर्वांचीच उत्कंठा वाढवली होती. लखनऊ सुपर जायंट्सने  (Lucknow Super Giants) शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) एका विकेटने पराभव केला. लखनऊच्या विजयानंतर निकोलस पूरन, मार्कस स्टॉइनिस यांची चौफेर चर्चा आहे. पण यासोबत लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मार्गदर्शक आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरही (Gautam Gambhir) सध्या जोरदार चर्चेत आहे. लखनऊच्या विजयानंतर गौतम गंभीरने साजरा केलेल्या विजयोत्सवरुन सध्या जोरदार टीका केली जात आहे. गौतम गंभीरने मैदानात उतरून साजरा केलेला विजयोत्सव आरसीबीच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या गेलेला लखनऊ विरुद्ध बंगळुरूचा सामना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामना ठरला आहे. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लखनऊने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 1 गडी राखून विजय मिळवला आहे. मात्र लखनऊच्या विजयानंतर गौतम गंभीरने केलेले सेलिब्रेशन सध्याचा वादाचा विषय ठरला आहे. त्याच्या विजयाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता त्याच्यावर टीका केली जात आहे. 


या विजयानंतर गौतम गंभीरचा संयम सुटला. डगआऊटमध्ये बसलेल्या गंभीर ताडकन उभा राहिला. गौतम गंभीर विजयानंतर उभा राहिला, उत्साहात हवेत ठोसे मारले आणि काहीतरी भाष्य केले. एवढेच नाही तर मैदानात प्रवेश केल्यानंतर त्याने आरसीबीच्या चाहत्यांना बोटाने इशारा करत गप्प राहण्यास सांगितले. संपूर्ण सामन्यात गौतम गंभीर शांत बसला होता पण आरसीबीच्या पराभवानंतर त्याचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते.



सामना संपल्यानंतर गौतम गंभीर मैदानावर गेला आणि आरसीबीच्या खेळाडूंशी हात मिळवला. यानंतर गौतम गंभीरने मैदानात बसलेल्या बंगळुरुच्या चाहत्यांना शांत राहण्याचा इशारा दिली. गौतम गंभीरचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गौतम गंभीर नेहमीच आरसीबीविरुद्ध आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले आहे. विराट कोहलीसोबतही त्याचे मैदानावर भांडण झाले आहे. सोमवारी रात्री आरसीबीच्या पराभवानंतरही गौतम गंभीर आक्रमक झाला होता.



शेवटच्या षटकात काय घडलं?


आरसीबीने बंगळुरुला 213 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पार करताना लखनऊची सुरूवात चांगली झाली नाही. मात्र काईली मेयर्स आणि कर्णधार केएल राहुल हे लवकर माघारी परतले. अखेरीस मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पुरन यांनी सामना हातात घेतला. दुसरीकडे लखनऊला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना हर्षल पटेलने रवी बिश्नोईला नॉन-स्ट्रायकर एंडवर गोलंदाजी करताना धावबाद करण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. यानंतर लखनऊचा जिंकला.