Jasprit Bumrah: टीम इंडिया ( Team India ) सध्या आयरलँड दौऱ्यावर आहे. शुक्रवारी पहिला सामना झाला असून डकवर्थ लुईस ( Duckworth Lewis ) च्या नियमाने टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सने आयरलँडवर विजय मिळवला. दरम्यान यावेळी दोन्ही टीम्समध्ये 3 सामन्याची टी-20 सिरीज खेळवण्यात येणार आहे. या सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) पहिल्यांदा नेतृत्व करतोय. दरम्यान यावेळी पहिल्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून स्वतःची छाप पाडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) ची उत्तम कॅप्टन्सी पहायला मिळाली. यावेळी सामन्यादरम्यान बुमराहचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये तो उत्तम पद्धतीने DRS घेताना दिसतोय. यावेळी चाहत्यांनी त्याची तुलना रोहित शर्मा आणि धोनीशी केली आहे. 


Jasprit Bumrah ने घेतला उत्तम डीआरएस


आयर्लंडविरुद्ध जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) ने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तो एक चांगला गोलंदाज असून चांगला कर्णधार देखील आहे. आयरलँडच्या डावातील 11व्या ओव्हरमध्ये रवी विश्वाई गोलंदाजी करत होता. यावेळी फलंदाजी करणारा मार्क एडेअर 16 रन्स करून फलंदाजी करत होता. बिश्नोईच्या या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर मार्कने चूक केली.


यादरम्यान रवी बिश्नोईच्या बॉलवर मार्कने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॉल थेट पॅडवर गेला. रवी विश्नोई याने आऊटसाठी जोरदार अपील केलं. मात्र अंपायर आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ही संपूर्ण घटना दुरून पाहत असलेल्या जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) ने डीआरएस घेतला. यावेळी रिप्लेमध्ये बॉल सरळ मिडल स्टंपला लागल्याचं दिसून आलं. त्यानंतर अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. 


यावेळी कॅप्टन्सी म्हणून बुमराहने चांगली कामगिरी केली. कर्णधार म्हणून बुमराह ( Jasprit Bumrah ) चा हा पहिलाच रिव्ह्यू होता. जो विचारपूर्वक घेतल्यानंतर त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलं जातंय.


टीम इंडियाचा 2 रन्सने विजय


आयर्लंड आणि भारत यांच्यातील पहिला टी20 सामना डब्लिनमध्ये 18 ऑगस्ट रोजी खेळला गेला. आयर्लंडकडून विजयासाठी मिळालेल्या 140 रन्सचा पाठलाग करताना भारतीय टीमने 6.5 ओव्हर्समध्ये 2 बाद 47 रन्स केले होते. अचानक लावलेल्या पावसाच्या जोरदार हजेरीने सामना थांबवावा लागला. यावेळी यशस्वी जयस्वाल याने 24 रन्स तर ऋतुराज गायकवाडने 19 रन्स केले. तर तिलक वर्मा शून्यावर बाद झाला.