VIDEO: ड्रेसिंग रुममध्ये झम्पा-स्टॉयनिसचे चाळे! व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एडम झम्पा आणि मार्कस स्टॉयनिस यांचा ड्रेसिंग रुममधला एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू एडम झम्पा आणि मार्कस स्टॉयनिस यांचा ड्रेसिंग रुममधला एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एडम झम्पा ड्रेसिंग रुममध्ये बाजूला बसलेल्या मार्कस स्टॉयनिसच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर मिचेल जॉनसन यानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे.
हा व्हिडिओ शारजाहमध्ये ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमधल्या पहिल्या वनडे मॅचवेळचा आहे. ऑस्ट्रेलियाने या मॅचमध्ये पाकिस्तानचा ८ विकेटने पराभव केला. पहिले बॅटिंग करुन पाकिस्तानने ५० ओव्हरमध्ये २८०/५ एवढा स्कोअर केला. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने ४९ ओव्हरमध्ये २ विकेट गमावून केला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने ११६ रनची खेळी केली, यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
मार्कस स्टॉयनिस हा आयपीएलमध्ये बंगळुरूकडून खेळतो. ऑस्ट्रेलियाची टीम नुकतीच भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा स्टॉयनिस हा ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात धोकादायक खेळाडू असल्याची प्रतिक्रिया विराटने दिली होती. २९ वर्षांच्या स्टॉयनिसने ३० वनडे आणि १९ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच खेळल्या आहेत. तर २६ वर्षांचा एडम झम्पा ऑस्ट्रेलियाकडून ४१ वनडे आणि २२ टी-२० खेळला आहे.