जयपूर : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी टीममध्ये असला किंवा नसला तरी चर्चेत असतो. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं सांगत धोनी १५ दिवस लष्करी सेवेसाठी गेला. काहीच दिवसांपूर्वी धोनी लष्कराचं ट्रेनिंग पूर्ण करून आला. यानंतर आता तो वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. धोनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी शनिवारी एका कार्यक्रमासाठी जयपूरला पोहोचला. धोनीला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी जयपूर विमानतळावर गर्दी केली होती. धोनी जेव्हा विमानतळातून बाहेर आला तेव्हा त्याचा हा नवा लूक समोर आला. या नव्या लूकमध्ये धोनीचं भारतीय लष्कराबद्दलचं प्रेम दिसत आहे. धोनीने लष्करी जवानासारखंच डोक्यावर काळ्या रंगाचं कापड घातलं होतं. ६ तास जयपूरमध्ये थांबल्यानंतर धोनी पुन्हा दिल्लीला गेला.



१५ ऑगस्टला धोनी लष्कराचं ट्रेनिंग संपवून परत आला. धोनी हा १५ दिवस काश्मीरमध्ये लष्करासोबत होता. यावेळी धोनीने पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्ट ड्यूटीची जबाबदारी सांभाळली.


७३व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धोनी लडाखमध्ये होता. लडाखमधल्या लहान मुलांसोबत धोनी क्रिकेटही खेळला. क्रिकेट खेळतानाचा हा फोटोही व्हायरल झाला होता. धोनी लवकरच लेहमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे.



वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये धोनी नसल्यामुळे ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सीरिजसाठी धोनीचं पुनरागमन होत का? ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ३ टी-२० आणि ३ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. टेस्ट क्रिकेटमधून धोनीने २०१४ सालीच निवृत्ती घेतली आहे.