भारत-ऑस्ट्रेलिया फायनलच्या सुरक्षेत मोठी चूक, पॅलेस्टाईन समर्थक मैदानात शिरला अन्... पाहा Video
Palestinian supporter infiltrated In IND VS AUS Final : गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॅलेस्टिनी समर्थक समर्थकाला अटक केली आहे. ज्याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी सुरक्षा भंग केला होता.
Palestinian supporter meet Virat Kohli : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND VS AUS Final) यांच्यात रविवारी वर्ल्ड कपचा (World Cup 2023) फायनल सामना खेळवला जात आहे. भारतानं सलग वर्ल्डकपमध्ये 10 मॅचेस जिंकल्या आहेत आता फायनल मॅच जिंकून भारत नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालाय. भारतानं आतापर्यंत 1983 आणि 2011 साली वर्ल्डकप विजयाची किमया साधलीय. तर ऑस्ट्रेलियानं तब्बल 5 वेळा वर्ल्डकप जिंकलाय. आता ऑस्ट्रेलियाला मात देऊन वर्ल्ड कपवर नाव कोरणं हेच टीम इंडियाचं लक्ष्य असेल. अशातच आता या सामन्याच्या सुरक्षेत (breaches security) मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय झालं पाहुया...
टीम इंडियाने चांगली सुरूवात केली पण पहिल्या तीन विकेट्स झटपट गेल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या 10 ओव्हरआधीच तंबूचा रस्ता पकडला. तर श्रेयस अय्यरची विकेट देखील लवकर गेली. त्यामुळे किंग विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी डाव सावरला. त्यावेळी मैदानात एका पॅलेस्टाईन समर्थकाने (Palestinian supporter) थेट मैदानात एन्ट्री केली अन् विराटची भेट घेतली. पॅलेस्टाईनवर होत असेलेला हल्ले थांबवा, अशा आशयाचा टी शर्ट या तरुणाने घातला होता.
पाहा Video
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.