कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 फायनलमध्ये भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय भारताचे बॉलर आणि फिल्डरनं योग्य ठरवला. वॉशिंग्टन सुंदरनं बांग्लादेशला पहिला धक्का दिला. पण भारताला मोठं यश मिळालं ते चहलच्या बॉलिंगवर शार्दुल ठाकूरनं पकडलेल्या कॅचमुळे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शार्दुल ठाकूरनं तमीम इक्बालचा बाऊंड्रीवर अफलातून कॅच पकडला. चहलच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर तमीमनं सिक्स मारायचा प्रयत्न केला पण शार्दुल ठाकूरच्या चपळाईमुळे भारताला दुसरी विकेट मिळाली. यावेळी तमीम इक्बाल १२ बॉलमध्ये १५ रन्सवर खेळत होता. शार्दुल ठाकूरच्या या फिल्डिंगचं सोशल नेटवर्किंगवर कौतुक होतंय.



शार्दुल ठाकूरनं या सीरिजच्या पहिल्याच मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध एका ओव्हरमध्ये २७ रन्स दिले. यानंतर शार्दुल ठाकूरला ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर पुढच्याच मॅचमध्ये ठाकूरनं ४ विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं. १४ मार्चला भारत आणि बांग्लादेशमध्ये झालेल्या मॅचमध्ये तमीम इक्बालनंच शार्दुल ठाकूरच्या एका ओव्हरमध्ये १७ रन्स केल्या होत्या. या ओव्हरमध्ये तमीमनं ठाकूरला ३ फोर आणि १ सिक्स लगावली होती.