नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना दिल्लीत होत आहे. टॉस जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीलाच टीम इंडियाला दोन झटके बसले. 


शिखर धवनची विकेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरूवातीलाच शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांच्या विकेट गेल्या. शिखर धवन दुस-या टेस्ट सामन्यात नव्हता. त्याला तिस-या सामन्यात केएल राहुलची जागा देण्यात आली. २३ रन्सच्या स्कोरवर त्याला दिलरूवन परेराच्या बॉलवर सुरंगा लकमलने कॅच आऊट केले. 


शिखर धवन या सामन्यात केवळ २३ रन्सच करू शकला. शिखर धवनकडून दिल्लीत चांगल्या खेळाची अपेक्षा होती. पण तसे झाले नहई. परेराच्या बॉलवर त्याने विकेट गमावली. परेराच्या बॉलवर सुरंगा लकमलने शिखरची शानदार कॅच घेतली. 


जबरदस्त कॅच



लकमलने ही कॅच खूप मेहनतीने पकडली. कॅच घेण्याच्या प्रयत्नात त्याचा शूजही निघाला होता. पण त्याने बॉल सोडला नाही. ही कॅच इतकी कठिण होती की, त्याच्या सहकारी खेळाडूंना विश्वासच बसला नाही. ही कॅच यासाठीही कठिण होती की, सकाळी मैदानावर दव पसरले होते. पण तरीही लकमलने जबरदस्त कॅच घेतली. 


परेराने तोडला मुरलीधरनचा रेकॉर्ड


श्रीलंकेचा सर्वात यशस्वी स्पिनर मुथय्या मुरलीधरनने आपल्या १०० टेस्ट विकेट घेण्यासाठी २७ टेस्ट सामने खेळले होते. यानुसार पहायला गेलं तर परेराने मुरलीधरनच्या तुलनेत २ टेस्ट सामन्यांमध्ये कमी खेळून ही उपलब्धी मिळवली आहे.