नवी दिल्ली : भलेही महेंद्र सिंह धोनी आता टीम इंडियाचा कर्णधार नाहीये, पण मैदानात तोच ‘खरा’ कर्णधार दिसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीसह तो टीममधील सदस्यांना मार्गदर्शन करत असतो. धोनी खासकरून गोलंदाजांना टीप्स देत असतो. टीममधील अनेक खेळाडूही त्याचं म्हणनं ऎकतात. पण तिस-या टी-२० सामन्यात सुरेश रैनाने धोनीचं ऎकलं नाही, त्यामुळे त्याला जोरदार फटका बसला. 


काय म्हणाला धोनी?


या सामन्यात सुरेश रैनाच्या या वागण्यामुळेच त्या दोघांमध्ये दरी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. तिस-या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत १७३ रन्सचे लक्ष्य दिले होते. भारतीय गोलंदाज पूर्ण जोर लावत होते. अशात धोनी मागे सक्रिय झाला होता. १४वा ओव्हर टाकण्यासाठी रैनाला बोलवण्यात आलं. त्याच्याआधीच्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने १६ रन्स दिले होते. सुरेश रैनाच्या पहिल्या तीन बॉलवर केवळ ३ रन्स गेले. पण चौथ्या बॉलआधी धोनी रैनाला काही टीप्स देत होता. धोनी ओरडत सांगत होता. तरी सुद्धा रैनाने त्याकडे लक्ष दिलं नाही. शेवटी त्याच्या बॉलवर फोर लगावला. सुरेश रैनाच्या ओव्हरमध्ये १२ रन्स गेले. 



गोलंदाजांकडून निराशा


खरंतर १७व्या ओव्हरमध्ये क्रिजवर दोन नवीन फलंदाज मैदानात आले होते. त्यांना लक्ष्य पूर्ण करणं कठिण वाटत होतं. पण जोंकरने फटकेबाजी करत टीम इंडियाच्या नाकी नऊ आणले. १८व्या ओव्हरमध्ये जोंकरने तीन फोर आणि एक सिक्स लगावला. ज्यानंतर १२ बॉलमध्ये त्यांनी ३५ रन्स केले. नंतर बुमराहच्या ओव्हरमध्ये एक फोर आणि एक सिक्स लगावत एकूण १६ रन्स दिले.