COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T20 World Cup 2022  Video : टीम इंडियाने वर्ल्ड कप 2022 सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2022 Semi Final) धडक मारली आहे. गुरुवारी इंग्लडसोबत रोहित शर्माची टीम खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. अशातच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या हाताला दुखापत झाल्याची (rohit sharma gets injured) बातमी समोर आली आहे. हे वर्ल्डकप अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. काही खेळाडूंची मैदानात जादू चालली तर काही खेळाडू आपला कारनामा दाखवू शकले नाहीत. टीम इंडियातील खेळाडू आर. अश्विनला (Ravichandran Ashwin) प्रत्येक सामन्यात संधी देण्यात आली पण मैदानात तो चांगली कामगिरी करु शकला नाही. माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev On R Ashwin)यांनीही त्यावर टीका केली आहे. अशातच आर. अश्विनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे. 


रविचंद्रन अश्विनच्या 'ते' कृत्य कॅमेऱ्यात कैद


सोशल मीडियावर भारत आणि झिम्बाब्वे मॅचच्या वेळीचा टॉसचा व्हिडीओ (IND vs ZIM Video)  सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा दिसतो आहे. पण हा व्हिडीओ रोहित शर्मामुळे नाही तर त्याचा मागे दिसत असलेल्या आर. अश्विनमुळे व्हायरल होतो आहे. आर. अश्विनचं एक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ नीट पाहा आर. अश्विन कपडे ओळखण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. ती पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पाहा तो नेमकं काय करतो. (Video t20 world cup 2022 r ashwin smelling clothes viral on Social media nmp)



Meme Fest चा धुमाकूळ!


पाहिलं तुम्ही अश्विन दोन जॅकेटमधील त्याचं जॅटकेट ओळखण्यासाठी दोन्ही जॅकेटचा वास घेतो.



कदाचित तो त्याचं जॅकेट ओळखण्याचा प्रयत्न करत आहे.



इंटरनेटवर अश्विनच्या या आयडियाने Meme Fest चा धुमाकूळ घातला आहे. नेटकरी अश्विनची टांग खेचताना दिसतं आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येतो आहे.