नवी दिल्ली: आशिष नेहराच्या निवृत्तीनंतर त्यांच्या सन्मानात पार्टी सेलिब्रेशन ठेवण्यात आले होते. यावेळी वीरेंद्र सेहवाग आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली तसेच माजी क्रिकेटपट्टूही मैदानात दिसले. जमलेल्यांनी  इतका केक लावला की नेहराचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते. एवढ्यानेही मन भरल नाही म्हणून द्या , मी अजून केक लावतो अशी सेहवागची वाक्य ऐकू येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे फास्ट बॉलर अजित आगरकरही या पार्टीमध्ये दिसले. आगरकरच्या फेअरवेल पार्टीचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  दरम्यान विराट कोहली हा नेहराला आपल्या हाताने केक भरविताना दिसत आहे. कोहलीने आपल्या ट्विटर हॅंडल वर आशिष भैया असा नेहराचा उल्लेख केला आहे.



नेहराने मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली.



त्यानंतर त्याने सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, कोहली आणि पाकिस्तानच्या इंझमाम-उल-हकच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.