VIDEO : विराट कोहली नेहरा-मॅक्कलमला म्हणला `यूजलेस`
भारताचा आणि आयपीएलच्या बंगळुरू टीमचा कॅप्टन विराट कोहली आशिष नेहराचा किती सन्मान करतो हे सगळ्यांना माहिती आहे.
मुंबई : भारताचा आणि आयपीएलच्या बंगळुरू टीमचा कॅप्टन विराट कोहली आशिष नेहराचा किती सन्मान करतो हे सगळ्यांना माहिती आहे. विराटमुळेच आशिष नेहराला त्याची शेवटची मॅच होम ग्राऊंड असलेल्या दिल्लीमध्ये खेळायला मिलाली. आता नेहरा बंगळुरूच्या टीमचा सल्लागार असून तो विराटबरोबर काम करत आहे. पण विराट नेहरा आणि त्याचा बंगळुरू टीममधला सहकारी ब्रॅण्डन मॅक्कलमला यूजलेस म्हणाला आहे. कॅमेरासमोरच विराटनं नेहरा आणि मॅक्कलमबद्दल हे शब्द वापरले.
गेम शोमध्ये तिघं आले एकत्र
एका गेम शोमध्ये विराट, नेहरा आणि मॅक्कलम एकत्र आले होते. रॉन्ग इन ६० सेकंड्स असं या गेम शोचं नाव आहे. या कार्यक्रमामध्ये रंजक प्रश्न विचारले जातात तरी या शोचं स्वरुप वेगळं आहे. या शोमध्ये प्रश्न विचारण्याआधी उत्तर दिलं जातं यानंतर प्रश्न विचारला जातो. या शोच्या नियमानुसार विराटनं नेहरा आणि मॅक्कलमला काही पर्याय दिले. नागीन डान्स, झोपतात, गंगनम स्टाईल, हेरगिरी करतात, जेवतात असे पर्याय विराटनं दिले होते.
यानंतर तुम्ही रात्री काय करता? असा प्रश्न विराटनं विचारला. मी हेरगिरी करतो, असं मॅक्कलम म्हणाला तर मी नागीन डान्स करत असल्याचं उत्तर नेहरानं दिलं. तेव्हा तुमची ही उत्तरं चुकीची असून तुम्ही यूजलेस आहात, असं विराट दोघांना म्हणाला. या कार्यक्रमात विराटनं दोघांना वेगवेगळे प्रश्न विचारले. नेहरा-मॅक्कलमनंही त्यांच्या खास शैलीत याची उत्तरं दिली.