Rohit Sharma Workout Video: भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी-20 मालिकेत भारताने 2-1 ने शानदार विजय मिळवला आहे. राजकोट येत्या खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर 91 धावांनी शानदार विजय मिळवला. दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर लगेचच भारत विरुद्ध श्रीलंका संघांमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी सध्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा अनफिट असल्यामुळे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र श्रीलंका विरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. तेव्हा वनडे मालिकेत पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma Workout Video) सध्या जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. सध्या रोहित शर्माच्या सरावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


हिटमॅनचा सरावाचा व्हिडिओ व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करणार असून त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये रोहित वनडे मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. विशेष बाब म्हणजे रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. तर बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहितला दुखापत झाली होती. त्यानंतर तो अद्याप परतलेला नाही.



रोहित यो-यो आणि डेक्सा चाचणीसाठी सज्ज 


बीसीसीआयने टीम इंडियामध्ये निवडीसाठी पुन्हा एकदा यो-यो आणि डेक्सा टेस्ट आणली आहे. जर खेळाडूंना टीम इंडियामध्ये प्रवेश हवा असेल तर त्यांना यो-यो आणि डेक्सा टेस्ट पास करावी लागेल. यासाठी चाचणी रोहित शर्माही सज्ज असल्याचे व्हिडिओमधून दिसून आले आहे.


यो-यो चाचणी म्हणजे काय?


यो-यो चाचणीमध्ये एकूण 23 स्तर आहेत. क्रिकेटपटूंसाठी हे स्तर 5 व्या स्तरापासून सुरू होतात. यात 20 मीटर अंतरावर एक कोण(वस्तू) ठेवले जातात आणि प्रत्येक खेळाडूला कोणाला हात लावून परत यायचे असते. यासाठी एक वेळ निश्चित केलेली असते. जशी-जशी स्तरांची संख्या वाढते, हे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळही कमी होतो. या आधारे गुण निश्चित केले जातात. बीसीसीआयने यो-यो चाचणी उत्तीर्ण होण्याचा स्कोअर 16.1 ठेवला आहे.


DEXA चाचणी म्हणजे काय?


खेळाडूंची फिटनेस तपासणी थोडी अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी फिटनेस प्रोग्राममध्ये डेक्सा चाचणीचा समावेश करण्यात आला आहे. हाडांची घनता चाचणीला डेक्सा स्कॅन म्हणूनही ओळखली जाते. ही एक विशेष प्रकारची एक्स-रे चाचणी आहे, जी हाडांची घनता मोजते. यामुळे फ्रॅक्चरचीही अचूक माहिती मिळते. तसेच, या चाचणीद्वारे शरीरातील चरबीची टक्केवारी, मास आणि टिशू याबद्दल सर्व काही जाणून घेता येते. 10 मिनिटांच्या या चाचणीतून खेळाडू किती तंदुरुस्त आहे याचा अंदाज येतो. ही चाचणी एक्स-रेच्या मदतीने केली जाते.


10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका 


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती, रोहित पूर्ण महिन्यानंतर मैदानात परतणार आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोहित शर्मा संपूर्ण ताकद लावत आहे. रोहितने इंन्स्टाग्रामवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहित जीममध्ये वर्क आउट करताना दिसत आहे. तसेच तो एका गाण्यावर डान्स करताना देखील पहायला मिळत आहे.  त्याने कॅप्शन लिहिले, "तेच करा, जे तुम्हाला आनंद देईल". यावर रोहितची पत्नी रितिका हिने देखील कमेंट करत हार्ट इमोजी दिली आहे.