मुंबई : आज २ एप्रिल... क्रिकेट फॅन्स हा दिवस कधीच विसरू शकणार नाहीत... कारण याच दिवशी २०११ साली भारतानं श्रीलंकेविरुद्ध मॅच जिंकून वर्ल्डकप मिळवला होता. क्रिकेटच्या इतिहासात एकेकाळी 'विश्वास म्हणजे राहुल द्रविड' असं समीकरणच बनलं होतं... त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये संकटाच्या प्रत्येक वेळी महेंद्र सिंह धोनीवरच प्रेक्षकांचा सर्वात जास्त विश्वास होता. हा विश्वास काही सहजच नव्हता... धोनीनं खूपच मेहनतीनं हा विश्वास कमावलाय... त्यामुळेच फॅन्स आनंदानं आणि गौरवानं म्हणताना दिसतात 'धोनी है तो मुमकिन है'... कारण जेव्हा जेव्ही भारतीय टीमला गरज लागली तेव्हा तेव्हा माही ढाल बनून विरुद्ध टीमविरुद्ध लढला... आणि टीमला विजय पथावर नेलं. वर्ल्ड कप २०१२ मध्येही एक वेळ अशी आली होती जेव्हा अनेकांचे श्वास अक्षरश: थांबले होते... कारण भारत मॅच जिंकू शकेल की नाही? असा प्रश्न त्यांना पडला होता. तेव्हाही धोनीनंच त्यांच्या या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर आपल्या खेळीतून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्वचितच असा फॅन असेल ज्याला धोनीनं फायनल मॅचमध्ये लगावलेला हा सिक्सर आठवत नसेल... त्या क्षणाला भारताला विजयासाठी ११ बॉलमध्ये ४ रन बनवायचे होते. तेव्हा धोनीनं नुआन कुलसेकराच्या बॉलवर सिक्सर ठोकत वर्ल्डकप भारताच्या नावावर केला... तो दिवस होता २ एप्रिल २०११... भारत आणि श्रीलंका दरम्यान वर्ल्डकपची फायनल मॅच रंगली होती... श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटींग हातात घेत ५० ओव्हरमध्ये २७४ रन बनवले. श्रीलंकेकडून महेला जयवर्धने यानं १०३ रन ठोकत शतकी खेळी केली. तर कुमार संघकाराचं अर्धशतक अवघ्या २ रन्ससाठी हुकलं. श्रीलंकेनं आपल्या डावात केवळ ५ विकेट गमावले.


भारताकडून झहीर खान आणि युवराज सिंह यांनी २-२ विकेट घेतल्या. जयवर्धने आणि संघकारा यांच्याव्यतिरिक्त कोणताही बॅटसमन मोठा स्कोअर उभारू शकला नाही.



गौतम गंभीर आणि विराट कोहलीनं तिसऱ्या विकेटसाठी ८३ रन्सची भागीदारी केली. कोहली पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर सर्वांच्या नजरा महेंद्र सिंह धोनीवर लागल्या होत्या. त्यानं गौतम गंभीरसोबत मिळून चौथ्या विकेटसाठी १०९ रन्सची भागीदारी केली. गौतम ९७ रन्स करून परेराच्या एका बॉलला बळी पडला. गंभीर बाद झाल्यानंतर धोनीनं युवराजसोबत ५४ रन्सची भागीदारी केली. धोनी ७९ बॉलमध्ये ८ फोर आणि २ सिक्सर ठोकत ९१ रन करत नाबाद परतला. नुआनच्या बॉलवर त्यानं ठोकलेला सिक्सर आजही क्रिकेटप्रेमी विसरू शकलेले नाहीत.