टीम इंडियाला आणखी एक धक्का, आता या खेळाडूला दुखापत
शिखर धवन, भुवनेश्वर कुमारच्या पाठोपाठ टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला आता दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे.
लंडन : शिखर धवन, भुवनेश्वर कुमारच्या पाठोपाठ टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला आता दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे.
टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पुढील सामना अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. यासाठी टीम इंडिया बुधवारी सराव करत होती. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर विजय शंकरला दुखापत झाली. विजय शंकर बॅटिंगचा सराव करत होता. बुमराहने टाकलेला बॉल विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला लागला. यामुळे विजय शंकरला दुखापत झाली.
विजय शंकरवर सध्या उपचार केले जात आहे. विजय शंकर लवकरच फिट होईल, अशी माहिती टीम मॅनेजमेंटकडून देण्यात आली आहे. विजय शंकरला झालेल्या दुखापतीमुळे फारशी चिंता करण्याची गरज नाही. दुखापतीतून विजय शंकर लवकरच बरा होईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
विजय शंकरचा रेकॉर्ड
पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे विजय शंकरला खेळण्याची संधी मिळाली. त्याला बॅटिंग करताना विशेष काही करता आले नाही. परंतु त्याने आपल्या बॉलिंगने कमाल केली.
भुवनेश्वर कुमारला झालेल्या दुखापतीमुळे विजय शंकरला त्याची ओव्हर टाकायची संधी मिळाली. विजय शंकरने आपल्या पहिल्याच बॉलवर टीम इंडियाला विकेट मिळवून दिली. विशेष म्हणजे विजयची ही वर्ल्डकपमधील पहिलीच मॅच होती.
वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा विजय शंकर हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये याआधी ८ खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे.