भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची सांगता झाल्यावर नुकतीच भारतात परतली आहे. शनिवारी विनेशच दिल्ली विमानतळावर आगमन झालं असून यावेळी तिचे चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले. हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 1 ऑक्टोबर रोजी निवडणुका पार पडतील. यंदा कुस्तीपटू विनेश फोगट ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून मेडल न घेता रिकाम्या हातीच भारतात परतावं लागलं. ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिला रौप्य पदक देण्यात यावे यासाठी क्रीडा लवादाकडे याचिका करण्यात आलेली होती. मात्र ही याचिका क्रीडा लवादाने फेटाळली. विनेश ही भारताची पहिली कुस्तीपटू आहे, जिने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. 


कुस्तीपटू विनेश फोगट यंदा हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिली. विनेशने यापूर्वीच आपण सक्रिय राजकारणात येणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्ष विनेशला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. विनेशच शनिवारी दिल्ली एअरपोर्टवर आगमन झालं तेव्हा तीच स्वागत करण्यासाठी काँग्रेस खासदार दीपक हुडा उपस्थित होते. संपूर्ण स्वागत यात्रेत दीपक हुडा तिच्या सोबत होते. विनेश फोगट ही मूळ हरियाणा राज्याच्या सोनिपत येथील बलाली या छोट्याश्या गावातून आहे. जेव्हा विनेश परिसहून भारतात परतली तेव्हा तिचे गावकऱ्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. 


हेही वाचा  : वामिका - अकाय कोहलीचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने शेअर केला क्यूट फोटो


विनेश फोगट नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे समोर आलेलं असलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार विनेश फोगट बहीण बबिता फोगट हिच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढाऊ शकते. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया हा कुस्तीपटू योगेश्वर दत्त विरोधात निवडणुकीसाठी उतरू शकतो. 


विनेश फोगटने निवृत्तीच्या निर्णयावरून घेतला यूटर्न?  


विनेश फोगट हिने अंतिम फेरीत अपात्र ठरल्यावर आपण कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर करत एक भावनिक पोस्ट लिहिली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच विनेशने पुन्हा एकदा पोस्ट शेअर करून ती २०३२ पर्यंत खेळेल असे संकेत दिले होते. तिने यात म्हंटले कि, "असू शकतं की वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मी स्वतःला 2032 पर्यंत खेळताना पाहू शकेन, कारण माझ्या आत अजूनही संघर्ष आणि कुस्ती शिल्लक आहे. भविष्यात माझ्यासाठी काय लिहिले आहे याविषयी मी भविष्यवाणी करू शकत नाही. पण मला विश्वास आहे की ज्या गोष्टींवर मी विश्वास करते अशा गोष्टींसाठी मी नेहमी लढत राहीन".